क्राईम

राज्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार

  • राज्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. बुलढाण्यातील अमडापूर येथे एका भरधाव वाहनाने बाईकला धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. प्रतिक भुजे (वय २५), प्रथमेश भुजे (वय २६) आणि सौरभ शर्मा अशी मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांची नावे आहेत. यातील प्रतिक व प्रथमेश हे चुलत भाऊ होते. तर सौरभ हा दोघांचा मित्र होता. हे तिघे जण चिखलीहून उदयनगर येथे जात होते. यावेळी ते अमडापुर परिसरात आले असता, एका वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
  • घटनेनंतर अज्ञात वाहनचालक हा फरार झाला. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाली. तेव्हा त्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. 
  • बुलढण्यात झालेल्या हिट अँड रन घटनेमुळे अमडापुर परिसरात खळबळ उडाली आहे. अमडापुर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्हीचा देखील शोध घेतला जात आहे.

Related Articles

Back to top button