क्राईम

रेव्ह पार्टीत धिंगाणा, बारबालांसोबत अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल

राज्यात एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी सुरु होती. 

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच एक रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला सुद्धा नाचवल्या गेल्या आहेत. पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला आहे. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. साताऱ्यातील रेव्ह पार्टीच्या या घटनेचे व्हिडिओ तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button