मनोरंजन

एकच नंबर! पुष्पा २ ची गाडी सुसाट

  • अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट आता एक हजार कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाने ९५० कोटींची कमाई केली होती. पण, आता एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यात चित्रपटाने एक हजार कोटींची कमाई करणार असल्याचे म्हटले आहे.
  • ‘पुष्पा २’ने चित्रपटाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट रिट्विट केली आहे, ज्यात म्हटले आहे की, ‘पुष्पा २’ ने सहा दिवसांत जगभरात एक हजार कोटींची कमाई केली आहे. असे म्हटले जात आहे की, ‘पुष्पा २’ सर्वात जलद गतीने एक हजार कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
  • ‘पुष्पा २’ हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करत आहे. मंगळवारच्या सुरुवातीच्या अहवालानुसार चित्रपटाच्या कमाईत किंचित घट होणार आहे. पण, हा सिनेमा आपले नाव कमावणार आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि मैथरी मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया निर्मित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंह शेखावत या भूमिका साकरल्या आहेत.

Related Articles

Back to top button