महाराष्ट्र

वाहनांशी संबंधित ‘हा’ नियम बदलणार

  • सोलापुरातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर कोणी हे नियम पाळले नाहीतर त्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. राज्यातील हे वाहन सुरक्षा नियम एक एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.
  • हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास 20 दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावावी लागणार आहे. या उपक्रमाचा उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आहे. जेणेकरून चोरीला गेलेली वाहने परत मिळवला येतील.
  • वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपीची तरतूद करण्याचे काम तीन एजन्सींना देण्यात आले आहे. ते आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील.
  • हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशनच्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत, जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात. हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात ही प्लेट तयार केली जाते. या क्रमांकांवर “इंडिया” असे देखील मुद्रित असते. याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र असते.
  • नवीन वाहनांची बुकिंग केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांना ही नंबर प्लेट लावावी लागेल. प्रवासी वाहनांसाठी 745 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी पाचशे रुपये, बाईक आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये एवढा खर्च येणार आहे.

Related Articles

Back to top button