क्राईम

मैत्रिणीवर चाकूचे वार, तिच्यासमोरच थाटात फेऱ्या, बघ्यांची गर्दी तरीही…

  1. पुण्यातील आयटी कंपनीत अकाऊण्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणीची त्याच्या सहकाऱ्याकडूनच सोमवारी हत्या करण्यात आली होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये सहकाऱ्याने तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले होते.
  2. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  3. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना चहूबाजूला अनेक जण उपस्थित होते, मात्र आरोपीच्या हातातील शस्त्र पाहून कोणाचीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत झाली नसावी. आरोपीने हातातील शस्त्र खाली टाकताच बघ्यांनी साहस दाखवत त्याला धरले आणि चांगला चोप दिला. तसेच तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील विमाननगर भागातील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीत अकाऊण्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाने आपल्याच सहकारी मैत्रिणीवर धारदार चाकूने वार करुन केले. तरुणीला रग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अति रक्तस्त्रावाने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संध्याकाळी कंपनीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button