महाराष्ट्र
ब्रेकिंग! एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळावर आपण समाधानी असल्याचे सांगितले. मी लोकप्रियतेसाठी नाही, तर जनतेसाठी काम केले, असेही ते म्हणाले. जनतेने महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी आहे. केंद्रातून मोदी- शहांचा मोठा पाठिंबा मला मिळाला. मी मोदींनी फोन केला आणि माझ्यामुळे अडचण होईल असे मनात आणू नका. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुतीचे प्रमुख म्हणून जसा भाजपसाठी अंतिम असतो, तसा आम्हालाही अंतिम आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.