महाराष्ट्र
तीन दिवसानंतरही मुख्यमंत्री ठरेना?

- राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 236 जागा मिळूनही महायुतीमध्ये मुख्यमंत्री ठरविण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल, अशी राजकीय चर्चा आहे. परंतु विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. मुख्यमंत्री ठरविण्याबाबत दिल्लीमध्ये भाजपच्या बैठका सुरू आहेत. त्यात आता भाजपकडून राज्यात निरीक्षक पाठविला जाणार आहे. निरीक्षक आमदारांची चर्चा करून त्यांचे मत जाणून घेऊन मुख्यमंत्री कुणाला करायचे यावर निर्णय घेणार आहे.
- भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव शर्यतीत आहे. फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असे जाहीरपणे भाजपचे आमदार सांगत आहेत. पण दिल्लीच्या नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदिल दाखविला असल्याचे वृत्त आहे. परंतु भाजपकडून अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात आता भाजपकडून पक्ष निरीक्षक राज्यात पाठविण्यात येणार आहे. हा पक्ष निरीक्षक आमदारांची मते जाणून घेईल. त्यानंतर निर्णय जाहीर करतील.