महाराष्ट्र

दिल्लीहून निरोप, मुख्यमंत्रिपदी फडणवीसच?

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु महायुतीमध्ये मात्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत रणकंदन पाहायला मिळत आहे.

दरम्यान काल दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत महायुतीच्या नेत्यांची बैठक देखील पार पडली. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे भाजपकडेच राहणार आहे, असा निर्णय दिल्लीत झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे अजित पवार हे सुरक्षेविनाच देवगिरी बंगल्यातून बाहेर पडले. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत.

महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे मुख्यमंत्रिपदासाठी आपापल्या नेत्यांच्या नावाचा जप करत आहे. तर शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री, असा दावा शिंदेसेनेकडून केला जात आहे. तर भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भावे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकावले आहेत.

Related Articles

Back to top button