महाराष्ट्र

ब्रेकिंग! एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

राज्यात आज 14 वी विधानसभा विसर्जित झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे कारभार पाहणार आहेत. राज्यात आज 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करावे लागणार आहे.

आज सरकारचा कार्यकाळ संपलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिंदे यांनी आज सकाळी राजभवानावर राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.

Related Articles

Back to top button