राजकीय
बिग ब्रेकिंग! राज्यात महायुतीची लाट नाही तर त्सुनामी

- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व २८८ जागांचे निकाल आता समोर येत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने चमकदार कामगिरी केली आहे. महायुती सध्या २२० जागांवर आघाडीवर आहे. या २२० जागांपैकी एकट्या भाजपला १२८ जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेना (शिंदे) ५५ जागांवर, तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी ३५ जागांवर आघाडीवर आहे.
- महायुती सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत महायुतीला चांगलाच फायदा झाल्याचे दिसते. कारण, आतापर्यंत महायुती तब्बल 220 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 57 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कणकवली येथून नीलेश राणे विजयी झाले आहेत. परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. हळूहळू निकालाचे चित्र आता स्पष्ट होत आहे. कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार हे आघाडीवर आहेत.



