राजकीय

तुमची किती मते? हे घ्या चार हजार रुपये…

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. आता सोलापूरसह अन्य भागात उद्या मतदान होणार आहे. तर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विरोधी उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर -लांजा-साखरपा या विधानसभा मतदारसंघात करण्यात आला आहे.
  • महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी हा गंभीर आरोप केला आहे. साळवी यांनी मध्यरात्री लांजा पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार केली आहे. लांजा तालुक्यातील एका ग्रामीण भागात गणेश लाखन नामक शिंदे गटाचा पदाधिकारी एका घरामध्ये संशयास्पदरीत्या पैसे देत असल्याची बाब गावच्या पोलीस पाटलांच्या निदर्शनामध्ये आली.
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यामध्ये मतदारांना पैसे वाटून बोटाला शाई लावल्याचे समोर आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी यावरुन आरोप करत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
  • या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुधा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे, असे ट्वीट दानवे यांनी केले आहे. या ट्वीटने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button