राजकीय
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मनसेने डाव टाकला

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आज मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केला. आम्ही हे करु अशा नावाने त्यांनी हा जाहीनामा प्रसिद्ध केला आहे.
- राज म्हणाले, अनेक पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले. मनसेचा जाहीरनामा मी आज प्रसिद्ध करतोय. माझी सतरा तारखेची सभा शिवाजी पार्कवरची त्याला अद्याप परवानगी आलेली नाही. त्यामुळे ती सभा आम्ही करणार नाही. त्याऐवजी आम्ही मुंबई, ठाणे या भागात सर्व मतदारसंघात दौरा होणार आहे.
- राज म्हणाले, ब्ल्यु प्रिंटमध्ये माझ्या जे आहे तेच प्रश्न आजही कायम आहेत, त्यातीलच काही प्रश्न मी या जाहीरनाम्यातून आपल्यासमोर मांडत आहोत आणि त्याचे निराकरणही करु.
- खालील मुद्द्यांवर भर देत राज यांनी या मुद्द्यांचे निराकरणही जाहीरनाम्यातून दिले आहे.
- मुलभूत गरजा आणि जीवनमान यावर राज यांनी आपल्या जाहीरनाम्यात भर दिला.
- दळणवळण वीज, शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, इंटरनेट व्यवस्थापन.
- राज्याचे औद्योगिक, व्यापर धोरण. प्रशासकीय़ नियंत्रण, कृषि पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण.
- मराठी अस्मिता, मराठी दैनंदिन वापर, प्रशासनात मराठी वापर, डिजिटल जगात मराठी, शिक्षणात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी मराठी साहित्य प्रसार, गड आणि किल्ले संवर्धन, पारंपारिक खेळ.



