राजकीय

ब्रेकिंग! ….तर ‘करारा’ जबाब देऊ

  • सध्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभांनी राजकारण तापू लागले आहे. दरम्यान काल येरवडा येथे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यातील सरकारने केलेली अनिर्बंध उधळपट्टी, भ्रष्टाचार, दिशाहीन कारभार, राज्याची झालेली पिछेहाट, वाचाळपणा, घसरलेली प्रचाराची पातळी आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार आसूड ओढले. यावेळी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.
  • मी याला संधी दिली, मी त्याला संधी दिली, असे काही जण म्हणत असतात. पक्षाने संधी दिली असे म्हणत नाहीत. आता तर अंडी पिल्ली बाहेर काढण्याची भाषा करताहेत. त्याच भाषेत बोलणे योग्य नाही. पण, तुम्ही मागचे काही काढणार असाल, तर आम्हालाही तुमची काही माहिती आहे.’तू तू , मैं मैं ‘ची लढाई करणार नाही पण ‘करारा’ जबाब देऊ, असे सुळे यांनी ठणकावून सांगितले.
  • विद्यमान आमदाराने पाच वर्षात काय केले हे बोलण्यात काही अर्थ नाही. आता शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. नवे विश्व उभारावे लागणार आहे. बापूसाहेब पठारे यांनी त्यांच्या परिसरात कोणताही अपघात झाला तर पोलीस स्टेशनला न जाता हॉस्पिटलला जावे, असा शब्द मला द्यावा, असे सुळे म्हणाल्या.

Related Articles

Back to top button