क्राईम
बीड जिल्ह्यात पु्न्हा एकदा धाड..धाड

- शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलेवर गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी घडली. रात्री उशिरा या महिलेला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महिलेच्या छातीत गोळी असल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे. शीतल कटमिल्ला पवार भोसले (वय २६) असे जखमी महिलेचे नाव आहे.
- जखमी शीतल हिला घेऊन रुचिका भोसले जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. शहागड येथून खरेदी करण्यासाठी बीडमधील गेवराईत आल्यानंतर गोळीबार झाला, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, वैद्यकीय तपासणी (एक्स रे) मध्ये महिलेच्या उजव्या छातीत गोळी असल्याचे निदान झाले. त्यामुळे शीतलला संभाजीनगरला रेफर करण्यात आल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात आहे.
- दरम्यान या गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नसून आता जबाब घेण्यासाठी पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना झाले आहे.



