राजकीय

वंचित बहुजन आघाडीला मत का द्यायचे?

  • मत म्हणजे तुमची शक्ती, राजकीय उपद्रव मूल्य. ही शक्ती,राजकीय उपद्रव मूल्य किती आहे? यावर ठरतं तुमच्या पक्षाचं वजन. पक्षांचे वजन वाढले की, तुमच्या शब्दाला किंमत येते.
  • तुमच्या शब्दाला किंमत आली, तरच तुमच्यावर आन्याय आत्याचार झाल्यावर तुमच्या बाजूने बोलणाऱ्याला हिंमत येते. तुमच्या हिताची, दृष्टीकोनाची धोरणे आखता येतात.तुमच्या बाजूने बोलणाऱ्याला हिंमत आली, तरच तुमचा आवाज सर्वदूर घुमतो. तुमचा आवाज सर्वदूर घुमला, तरच तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटते.
  • तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटली, तरच तुम्हाला वाटा भरून ताटली मिळणार आणि म्हणूनच तुमची शक्ती वाढविण्यासाठी; तुमच्या शब्दाला किंमत येण्यासाठी; तुमची हिंमत वाढण्यासाठी; तुम्ही जिवंत आहात हे दाखवण्यासाठी; तुम्हाला वाटा भरून ताटली मिळण्यासाठी; तुमच्या पक्षाला अधिकृत राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी; तुमचं एक एक मत महत्त्वाचे आहे. तुमचा उमेदवार पडला, तर तुमचे मत वाया जाईल’ अशा वावड्या उडवत काही दलाल आपल्याला गुमराह करतील, गोंधळात पाडतील, आणि चालाखीने, प्रस्थापित पक्षांच्या वा ‘निवडूण येणार्या उमेदवारांना मत द्या,’ म्हणून तुमची फसगत करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना बिनतोड जवाब द्या. की, अरे चोरा, राजकारण करणं म्हणजे, निवडणूक जिंकणं एवढंच नव्हे,
  • तर ‘राजकीय शक्ती’ म्हणून, वंचित बहुजनांचा आवाज बुलंद करणे, वाढवणे हा सुध्दा अतीमहत्वाचा भाग असतो.
  • प्रस्थापित पक्षांपेक्षा आमच्या राजकीय भूमिका, धोरणदृष्टी वेगळी आहे, हे मतांच्या टक्केवारीच्या जोरावर मांडणे, हेही एक राजकारण असतं, तेव्हा तू आपला तिकडंचं चाटुगीरी कर”
  • राजकारण म्हणजे, फक्त निवडणूक जिंकणं एवढंच तुझ्या शेंबड्या बुध्दीला कळतंय!
  • पण बाबासाहेब निवडणूक हरले तरी आंबेडकरवाद हा आज राज्यशास्त्राचा विषय आहे. हे लक्षात ठेवा.
  • हे सडेतोड उत्तर वंचित बहुजन आघाडीचे शहर- वाड्या-पाड्या- वस्त्या गावागावातील समर्थक देतील. यावेळी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत मान्यताप्राप्त पक्ष बनवण्यासाठी म्हणून, नक्कीच सर्वजण आपापल्या मतदारसंघात कसोशीने प्रयत्न करतील, ही खात्री आहे.
  • हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सगळया कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा प्रत्येक ग्रुप सर्व सोशल मीडियावर सोडा कारण मताची किंमत आपल्या पक्षाची किंमत आणि आपली किंमत हे सगळ्यांना कळू द्या.

Related Articles

Back to top button