क्राईम

‘मोक्का’तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी विश्वातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, पुण्यात मोक्का प्रकरणातील कुख्यात गुंडाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याची आलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी गुंडासोबत रॅलीमध्ये असणाऱ्या युवकांनी आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय, अशा प्रकारच्या घोषणा देखील दिल्या.

मोक्का कलमांतर्गत येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे हा दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या जवळपास ६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

संतापजनक बाब म्हणजे रॅलीतील युवकांनी परिसरातील नागरिकांना धमकावले होते. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय, असे म्हणत रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. 

Related Articles

Back to top button