राजकीय

ब्रेकिंग! राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही

  1. सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान काल एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर आज भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही. महायुतीचा मुख्यमंत्री होईल, अशी प्रतिक्रिया दिली. एका अर्थाने महायुतीत भाजपासोबतच इतर घटक पक्ष मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, हे त्यांनी स्पष्टच केले आहे.
  2. काँग्रेसचे मुंबईतील नेते रवी राजा यांनी आज मुंबईत फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.
  3. फडणवीस म्हणाले, राज यांनी महायुतीचे सरकार येईल आणि भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी वक्तव्य केले. मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा मी आभाराने स्वीकारतो. पण भाजपाचे नाही तर महायुतीचे सरकार येणार आणि भाजपाचा नाहीतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
  4. फडणवीस पुढे म्हणाले, अजून आमची सर्व बोलणी सुरु आहे. राज ठाकरे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत आहे. आमचा प्रयत्न आहे की, आम्ही सर्व एकत्र राहू. राज यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रीय अस्मितेला भाजपाचे नेहमीच समर्थन राहीले आहे. त्यासोबतच राष्ट्रीय अस्मिताही महत्वाची ती म्हणजे हिंदुत्व आणि राष्ट्रीय हिंदुत्व राज यांनी स्वीकारली आहे.

Related Articles

Back to top button