मोठी बातमी! महाविकास आघाडीसाठी ठाकरेंनी नमतं घेतलं

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा काही आणखीही सुटलेला दिसत नाही. कधी जागावाटप फायनल झाल्याचे सांगितले जाते, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगतात. अशातच आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचे समजते.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इतर मित्रपक्ष या सर्वांचे समाधन होईल, अशाप्रकारचे जागावाटप आमच्याकडून होत आहे. त्यामध्ये 90 चा, 95 चा आणि 100 चा फॉर्म्युला या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आम्ही सगळे एकत्र लढत आहोत. दिग्रजबाबत आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली आहे.
दिग्रजमधून आमचा उमेदवार लढणार नाही. माणिकराव ठाकरे यांच्यासाठी ती जागा आम्ही सोडली आहे. यासंदर्भात बाळासाहेब थोरात आणि रमेश चेन्नीथला यांच्याशी काल चर्चा झाली आहे. दिग्रजच्या बदल्यात दर्यापूर हा मतदारसंघ काँग्रेसने आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे त्या जागांवरून आमच्यात वाद नाही.



