राजकीय

वय झाले तरी शरद पवारांना मोह आवरेना

  • वय झाल्यामुळे राजकारणातून निवृत्ती घेऊन नव्या पिढीला संधी मिळावी, अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलून दाखवली होती. त्याला आधी होकार नंतर नकार देत ज्येष्ठ नेते शरद पवार मागे फिरले होते. त्यानंतर मुलगी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली जातील, अशी चर्चा होती. परंतु, या सर्व चर्चांवर ज्येष्ठ नेते पवार यांनीच पूर्णविराम दिला. आपण निवृत्ती घेणार नाही. पक्षाची सूत्रे कुणाकडेही देणार नाही, असे संकेत पवारांनी दिले.
  • अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांनी काल शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील अजितदादांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांनी पुढील दिशा स्पष्ट केली. पवार म्हणाले, काही मुलांनी एक बोर्ड हातात घेतला होता. त्यात माझा फोटो होता.
  • त्यात लिहीले होते की 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचे आहे. 84 वर्षांचा असो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला मागील साठ वर्षात एक दिवसही तुम्ही सुट्टी दिली नाही. महाराष्ट्राचा चेहरा बदलवण्याची माझी जबाबदारी आहे.

Related Articles

Back to top button