ब्रेकिंग! राज्यातील निवडणूक कार्यक्रम आजच होणार जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने पत्रक काढले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता पुन्हा रंगणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या सभा, लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपाटा लावला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभर दौरे आणि विविध निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यात आज दुपारी साडे तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
भारत निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. राज्याच्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबरला संपणार असून त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि आणि झारखंड या राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे.