राजकीय

ब्रेकिंग! राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोमाने वाहू लागले आहे. त्यासोबतच राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीत सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व तुपकर यांची भेट घडवून आणली गेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मागील चार दिवसांत दोन वेळा बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीत ठाकरे आणि तुपकर यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत सहभागी करून त्यांना काही जागा दिल्या जाण्याची शक्यता असून यामध्ये बुलढाणा विधानसभेसाठी तुपकर आग्रही असल्याचे कळते. तुपकरांनी राज्यात २५ ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा पुणे येथील बैठकीत केली होती. बुलढाणा, वर्धा, वाशिम, लातूर, हिंगोली यासह विविध जिल्ह्यांत तुपकरांनी मेळावे व सभांचा धडाका सुरू केला आहे.

लोकसभेत बुलढाणा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवून तुपकरांनी अडीच लाख मते घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीला कडवी झुंज दिली. थोड्या फरकाने तुपकरांचा पराभव झाला. 

 

Related Articles

Back to top button