सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! या दिवशी मद्य विक्रीला बंदी

सोलापूर- नवरात्र महोत्सव निमित्त सोलापुर शहरात व कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापुर – तुळजापुर महामार्गावर सार्वजिनिक शांतता राखणे आवश्यक असल्याचे मत झाल्याने, महाराष्ट्र मदय निषेध अधिनियम मधील कलम 142/ (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सोलापूर महानगरपालिका हद्दीतील व सोलापुर- तुळजापुर या मार्गावर श्री क्षेत्र रुपाभवानी मंदीरापासुन पुढे जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद, यांचे आदेश पुढील प्रमाणे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दसरा (विजयादशमी) निमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किरकोळ देशी व विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील.तसेच दिनांक 15 व 16 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापुर- तुळजापुर या मार्गावर श्री क्षेत्र रुपाभवानी मंदीरापासुन पुढे तुळजापुर मार्गावर सोलापुर जिल्याच्या हददीत असणा-या सर्व देशी व विदेशी किरकोळ मदय विक्री व ताडी अनुज्ञप्त्या विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद राहतील.या आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश दिले आहेत.

Related Articles

Back to top button