क्राईम

ब्रेकिंग! या शहरात दोन गटात राडा

राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. दरम्यान अकोल्यातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दोन गटात मोठा राडा झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
दोन गटाने एकमेकांवर दगफेक करत चारचाकी गाड्या पेटवल्याची घटना घडली आहे.
ही घटना अकोल्यातील हरीपेठ भागात घडली आहे. जमावाला पांगवण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अकोल्यातील हरीपेठ भागात एका ऑटो रिक्षाला दुचाकीचा धक्का लागला. त्यानंतर दोन्ही चालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर मोठा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुढे दोन गट समोरासमोर आले आणि जाळपोळ झाली. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Back to top button