महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेनंतर पुन्हा नवीन योजना

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आता महिलांसाठी सरकारकडून आणखी एक नवीन योजना आणली जाणार आहे. भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देणार आहेत. या उपक्रमा अंतर्गत जवळपास पाच हजारपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतलेला आहे.
महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना रोजगार मिळणे हा या योजनेचा मुख्य योजना आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळून देण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटनदेखील करण्यात आले आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील महिलांनी तयार केलेले पदार्थ वस्तू ऑर्डर नुसार वितरकांपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची काम केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना वस्तू तयार करण्याची आणि कोणालाही त्रास न देता उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button