महाराष्ट्र
शरद पवारांनी केले मोदींचे अभिनंदन
ज्येष्ठ नेते शरद पवार अलीकडे चर्चेत आहेत. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने काल मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. केंद्र सरकारने ती मागणी काल मान्य केली. आज सकाळीच पवारांनी पत्रकार परिषद घेत केंद्राचे याबाबत अभिनंदन केले.
पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ते म्हणाले, काल केंद्र सरकारने आसामी, पाली, मराठी आणि इतर दोन भाषांना अभिजात दर्जा दिला. या निर्णयामुळे या भाषांचे महत्त्व वाढेल. पवारांनी आपल्या स्टाईलने अभिनंदन करताना सरकारचे कानही टोचले. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारची ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. जो निर्णय झाला तो खूप उशीरा झाला. जरी उशीर झाला तरी निर्णय झाला. त्याबद्दल केंद्र सरकारचे मी अभिनंदनच करतो.