सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! कर्ज फेडण्यासाठी चार लाख आण म्हणत प्रचंड छळ

सोलापूर (प्रतिनिधी) कर्ज फेडण्यासाठी व घर घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच पती मोहिरोद्दीन याने पत्नीला तलाक ए हसन प्रमाणे तीन नोटीस पाठवून तलाक दिला असल्याची फिर्याद आदिबा मोहिरोद्दीन हरकारे (वय-२२,रा.साखरपेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून पती मोहिरोद्दीन,सासू फेरोजा, सासरे लियाकत, दिर जिशान,नणंद सुमय्या व नणंदेची पती मुजाहिद, फातीमा शेख, हलीमा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ९ जानेवारी २०२२ ते आजतागायतपर्यंत फिर्यादी यांच्या सासरी जवाहर नगर संत तुकाराम नगर सोलापूर येथे घडली. पुढील पोसई.तपास ढेरे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button