क्राईम
ब्रेकिंग! बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दणका
बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. अत्याचार प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह अध्यक्षांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी विश्वस्तांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे या ट्रस्टींचे नाव आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने त्यांना यापूर्वीच फरार म्हणून घोषित केले आहे.
बदलापुरातील एका नामंकित शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने बदलापूरसह ठाण्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला.