क्राईम

ब्रेकिंग! इंदापुरात गोळीबाराचा थरार ; वीजपुरवठा खंडीत झाला की केला?

इंदापूर शहरात महाविद्यालयासमोर एका युवकावर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. बारामतीमध्ये एका महाविद्यालयीन युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आज सायंकाळी इंदापुरात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
राहुल अशोक चव्हाण (वय-२५ वर्षे रा. शिरसोडी, ता. इंदापूर)असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना शहरातील जुना पुणे-सोलापूर महामार्गावरील महाविद्यालयासमोर आज घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. राहुल चव्हाण या युवकाच्या पाठीवर चार गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
दरम्यान, हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पावणेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. नेमक्या याच संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल याच्यावर गोळ्या झाडल्या. सतत रहदारी असणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Back to top button