महाराष्ट्र

राज्यात डोकं बधीर करणारी घटना

एका २३ वर्षीय तरुणाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. डोकं बधीर करणाऱ्या या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ओम जयचंद पुरी असे आरोपीचे नाव आहे.
पीडित वृद्धेच्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला हिंजवडीतून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी दरम्यान पीडित वृद्धा फ्लॅटच्या समोरील मोकळ्या जागेत फेऱ्या मारत होती. त्याचवेळी निळसर रंगाचा चौकड्याचा शर्ट घातलेल्या इलेक्ट्रेशियनचे काम करणाऱ्या इसमाने वृद्ध महिलेचे पाठीमागून तोंड दाबले व सर्व्हिस लिफ्टच्या जिन्यातून ओढत फरफटत ६ व ७ व्या मजल्याच्या जिन्यामध्ये नेले. 

तिथं त्याने वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अत्याचार व मारहाणीमुळे ही वृद्ध महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. वृद्ध महिला घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता ती इमारतीच्या जिन्यात बेशुद्धावस्थेत आढळली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

Related Articles

Back to top button