बिजनेस

खुशखबर! अवघ्या 15 मिनिटात चार्ज करा आणि सुस्साट धावा

भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आज एकापेक्षा एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार्स लाँच होत आहे. यातच Kia देखील भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे.
भारतीय बाजारात Kia आपली नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV9 लाँच करणार आहे. या कारमध्ये कंपनी उत्तम रेंजसह भन्नाट फीचर्स देखील देणार आहे. माहितीनुसार भारतीय बाजारात ही कार पुढील महिन्यात म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीकडून Kia EV9 बरोबरच कंपनी Kia Carnival देखील लाँच करणार आहे. या कारमध्ये देखील जबरदस्त फीचर्स मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारची किंमत 80 लाखांपर्यंत असू शकते. मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती कंपनीकडून शेअर करण्यात आलेली नाही.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Kia EV9 मध्ये जबरदस्त फिचर मिळणार आहेत. या कारमध्ये 99.8 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. ही कार फास्ट चार्जरने 24 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होणार आहे. तसेच ही कार सिंगल चार्जमध्ये 561 किमीची रेंज देणार आहे. ही कार भारतीय बाजारात ऑल व्हील ड्राइव्ह टेकनॉलॉजीसह लाँच होणार आहे.

Related Articles

Back to top button