राजकीय

ब्रेकिंग! राज्यात ‘तुतारी’चा आवाज बसला

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या दोन्ही आघाडीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
  • सध्या समोर आलेल्या कलानुसार महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. पुण्यात देखील महायुतीने जोरदार मुसळी घेत ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. पुण्यात विधानसभा निवडणुकीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
  • माहितीनुसार, पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर,कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर आहेत तर हडपसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर, वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे पुढे आणि खडकवासल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहे.
  • कसबा विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर हेमंत रासने यांनी 12740 मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत कसबाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 640 मतांची आघाडी घेतली होती. तर शिवाजीनगरमध्ये आठवी फेरी अखेर सिद्धार्थ शिरोळे यांनी 14429 मतांची आघाडी घेतली आहे. तर मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके यांना 33984 मतांची आघाडी मिळाली आहे. राज्यातील इतर भागातही शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

Related Articles

Back to top button