महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेबाबत नवे वक्तव्य

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. या योजनेला सोलापूरसह अन्य भागातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या योजनेमध्ये राज्यात दीड कोटीहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. मात्र या योजनेवरून महायुतीतच श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आलेली योजना आहे. महायुतीतील मुख्यमंत्री शिंदे, उपुमख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी ही योजना स्विकारली. त्यानंतर तो विषय कॅबिनेटसमोर आला. कॅबिनेटसमोर विषय आल्यानंतर तिथेही ही संकल्पना मुख्यमंत्री शिंदेंची आहे, असा विषय झाला. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना उचलून धरली. त्यामुळे श्रेयवादात जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून आलेली संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजूरी दिली, अशी रोखठोक भूमिका सामंत यांनी मांडली. सामंत यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.

Related Articles

Back to top button