क्राईम
तरुणीची छेड काढल्याने मोठा राडा
- राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. दरम्यान कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. तरुणीची छेड काढल्याचा आरोप करत दोन गटात भररस्त्यात तुफान राडा झाला.
- यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले आहेत.पोलिसांनी दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी दोन तरुणांनी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला. जाकिर शेख आणि अरहम सय्यद अशी या तरुणांची नावे आहेत.
- या दोघांनी तरुणीला तिचा मोबाइल नंबर देखील मागितला. मात्र, तरुणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तरुणीचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी अरहम सय्यद याच्या घरी गेले. या दरम्यान तरुणीचे नातेवाईक आणि तरुणाच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला.
- हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. याची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
- याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केला आहे. जाकीर शेख, अरहम सय्यद यांना अटक करण्यात आली आहे.