महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना खुशखबर! लवकरच मिळणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे

  • लाडकी बहिण योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दोन हफ्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे. अशातच लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. 
  • कारण आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्टला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आली आहे. 
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या योजनेचा तिसरा हफ्ता 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र याची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button