मनोरंजन

ब्रेकिंग! मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेत्री  मलायका अरोराशी संबंधित दु:खद बातमी येत आहे. मलायकाच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला आहे. मलायकाच्या वडिलांनी वांद्रे येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीनंतर मलायका पुण्याहून मुंबईला रवाना झाली आहे. सध्या मलायकाच्या वडिलांचे पार्थिव बाबा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
ही बातमी कळताच मलायकाचा माजी पती अरबाज खान अभिनेत्रीच्या घरी पोहोचला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायकाच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली आहे. वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, सध्या पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मलायकाचे वडील काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button