राजकीय

ब्रेकिंग! शरद पवार गटाचा नवा धमाका

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ९० ते १०० जागांवर तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक स्तरावर आपली तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास विधानसभेची तयारी सुरु केल्याचे समोर आले आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, बूथ कमिट्या तयार करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गणेशोत्सवानंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याचे समोर आले आहे. 

Related Articles

Back to top button