सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! शिवबारत्न पुरस्काराची घोषणा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत वंदनीय रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज यांची विचारधारा आजच्या पिढीचे ऊर्जा स्त्रोत आहे. ही ऊर्जा आणि  शिवनीतीची मूल्ये घेऊन सोलापुरात  शिवबा बहुउद्देशीय  समाजसेवी संस्थेची अव्याहतपणे वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विधायक उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र भूमीतील प्रतिके, व्यक्तीमत्व यांचा वारसा जपला पाहिजे. महाराष्ट्राला विचार,आचार आणि आकार देण्यासाठी आयुष्य समर्पित केलेले समाज सुधारक, समाजसेवक, विचारवंत यांचे योगदान केंद्रस्थानी ठेवून सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे. 
याच अनुषंगाने समाजात विविध क्षेत्रात भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या समाज धुरीणींचा दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवाबरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  
सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सांयकाळी 6 वाजता  नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृह येथे शिवाबरत्न पुरस्कार सोहळा 2022 पार पडणार आहे. 
  
शिवबारत्न पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती
1)शिवबारत्न जीवनगौरव पुरस्कार  
ह. ना.जगताप  
2) शिवाबरत्न समाज भुषण पुरस्कार 
ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज 
3) शिवबारत्न विशेष सन्मान पुरस्कार-  विजयकुमार पिसे दै. तरुण भारत- संपादक
4) शिवबारत्न पत्रकार पुरस्कार-  सागर सुरवसे-TV-9
5) शिवबारत्न छायाचित्रकार पुरस्कार-  प्रमोद हिप्परगी
6) शिवाबरत्न सामाजिक संस्था पुरस्कार 
कै.व्यंकटनरसू विरय्या सिंगम प्राथमिक शाळा  
7) शिवाबरत्न आदर्श नगरसेवक 
चेतन नरोटे 
 शिवबारत्न आदर्श शिक्षक पुरस्कार
1) डॉ. मधुकर जक्कन- अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, प्राध्यापक
2) अँड.अरविंद देडे- दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूर
3) मोहिनी मोरे ताकटे – किडा शिक्षक
4) सुरय्या जहागीरदार – एम. ए. पानगल उर्दू हायस्कूल 
5) धनंजय नकाते – एस.व्ही. सी. एस. MIDC, सोलापूर
  शिवबारत्न पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींचा सन्मान सोहळा  
 श्री.सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर 
 ( पाचवे पिठाधिपती श्री नाथ संस्थान औसा) यांच्या हस्ते अरविंद जोशी ( जेष्ठ पत्रकार ) यांच्या अध्यक्षतेखाली  प्रमुख अतिथी  डॉ. दिपाली काळे
पोलीस उप आयुक्त डॉ. निशा वाघमारे
वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र पदव्युत्तर विभाग प्रमुख नाना काळे
सोमपा माजी सभापती
पुरुषोत्तम बरडे
शिवसेना जिल्हाप्रमुख
विक्रम खेलबुडे
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ- अध्यक्ष
सुरेश फलमारी- पदमशाली ज्ञाती संस्था- अध्यक्ष   
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शिवबारत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.  
ही माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सौ. वनिता मारा, हरिनिवास बिल्ला, कु.विद्या बोध्दूल, नागेश सरगम, व शिवबा  संस्थेचे विधी सल्लागार अँड. अनिल वासम उपस्थितीत होते.

Related Articles

Back to top button