महाराष्ट्र

ब्रेकिंग! शाळांमध्ये, महिलांकडे आता पॅनिक बटण येणार?

  1. राज्य सरकारने बदलापूर प्रकरणी एका समितीची स्थापना केली असून या समितीच्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केसरकरांनी ‘पॅनिक बटण’वर देखील महत्त्वाचे सुतोवाच केले आहे.
    केसरकर म्हणाले, एकत्र समिती स्थापन केली आहे. या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्ष, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि आयजी पोलीस विभागाला विशेष मार्गदर्शक म्हणून बोलावले आहे. याचा सविस्तर अहवाल उद्या प्राप्त होऊन बुधवारी यावर चर्चा करू.
    असे प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल. कालच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला. मी राज्यमंत्री होतो, तेव्हा मी एक प्रस्ताव सादर केला होता. आपण पॅनिक बटण शाळांमध्ये लावावे आणि महिलांना द्यावे. महिला आणि मुले अडचणीत आल्यावर पॅनिक बटण दाबल्यास पोलिस ठाण्यात त्वरीत माहिती कळते. मग ट्रॅकिंग सिस्टममुळे पोलिसांपर्यंत ही संबंधित व्यक्ती कुठे गेली हे समजते. ही सिस्टम ऑफलाईनही चालते. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केले आहे. हे सुरू केले तर अशा घटनांवर नक्कीच नियंत्रण येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

Related Articles

Back to top button