महाराष्ट्र

आता जे पैसे दिले जात आहेत, तो लोकांचा टॅक्स आहे

  • लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचा गाजावाजा झाला. परंतु, विरोधकांकडून या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या योजनेबाबत एक विधान केले आहे. लाडकी बहीण योजना सुरु आहे, तुमचे सरकार आल्यावर तुमची भूमिका काय असणार? यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज म्हणाले, तुम्ही (सरकार) लोकांना अशाप्रकारे ढीले करून चालणार नाही. लोकांना कामाला लावा. लोक काम मागत आहेत, फुकटचे पैसे मागत नाहीत.  
  • राज पुढे म्हणाले, शेतकरी फुकटची वीज मागत नाही. त्या विजेत खंड नको, हेच तो मागतोय. तुम्ही पहिल्यांदा या लोकांच्या मागण्या समजून घ्या. तुम्हाला मते हवीत, म्हणून तुम्ही वाटेत ते फ्री देता. फ्री म्हणजे कुणाचे आहे ते, ते लोकांचे आहे. आता जे पैसे दिले जात आहेत, तो लोकांचा टॅक्स आहे. तुम्हाला असे करून चालणार नाही. महाराष्ट्रात असंख्य नोकऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या पोरांना नोकऱ्या करायच्या आहेत. पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.

Related Articles

Back to top button