महाराष्ट्र

ब्रेकिंग! स्त्रियांवर अत्याचार होत असेल तर मी…

बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले. पुणे स्टेशन परिसरात मुसळधार पावसात जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह अनेकजण सहभागी झाले होते. यावेळी पवारांनी स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात उपस्थितांना भर पावसात महिला सुरक्षेची शपथ दिली.

पवारांनी वाचलेल्या शपथेत काय?- मी, अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर, त्याला मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही. महिलांचा सन्मान राखेन, या पुण्यनगरीमध्ये नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद!

Related Articles

Back to top button