महाराष्ट्र

ब्रेकिंग! महिलांना आनंदी आनंद

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
पहिला आणि दुसरा हप्ता असे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, सध्या ट्रायल म्हणून रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. प्रत्यक्षात 17 ऑगस्टनंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तीन चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button