महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी…

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बहुतांशी महिलांना लाभ होणार आहे. एक जलैपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये डोमेसाईल प्रमाणपत्र असण्याची जाचक अट रद्द करा किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत केदार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले आहे.
    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करून अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. जो लाखो महिलांच्या जीवनात योगदान देईल. या योजनेसाठी लावलेली डोमेसाईलची अट अतिशय जाचक आहे. हा दाखला काढणे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रसुद्धा किचकट आहेत. साधारण गाव खेड्यात काम करणाऱ्या महिलांना त्याची जुळवाजुळव करणे मुश्किल आहे. तसेच ते निघायला साधारण 10 ते 15 दिवस जातात. त्यामुळे रहिवाशी दाखला म्हणून तलाठ्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड ग्राह्य धरावे, अशी आग्रही मागणी केदार यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील सदर विषयाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे. अलीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. 
ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दीड हजार रूपये जमा होणार आहेत.

Related Articles

Back to top button