सोलापूर
सोलापुरातील रेल्वे प्रवाशांना खुशखबर

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका व परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी, कोरोना काळापासून बंद असलेला मोहोळ रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस ( गाडी नंबर 12116 सोलापूर ते मुंबई व 12115 मुंबई ते सोलापूर) गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
- या मागणीचा सकारात्मक विचार करून, मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा ( गाडी नंबर 12116 सोलापूर ते मुंबई व 12115 मुंबई ते सोलापूर ) थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रवासी, व्यापारी वर्ग, शेतकरी आणि भाविक नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- मोहोळ आणि आसपासच्या भागात रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असून, तालुक्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती. हा थांबा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वेळेची बचत होणार आहे.



