महाराष्ट्र

मतदान केंद्रावर गेले पण…

आज राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यासाठी अनेक कलाकार मंडळी देखील बोटावर शाई लावून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र तसेच प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक यांनी आज सोशल मीडियावर मतदानाविषयी आलेला एक वाईट अनुभव शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

दोघांनीही अनेक प्रयत्न करुनही त्यांना मतदान करता आले नाही, हे अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी मतदानाला गेली होती, परंतु मला मतदान करताच आले नाही, असे तिने सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती ज्या ठिकाणी सातत्याने मतदान करते त्या मतदार यादीतच तिचे नाव नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिच्या कुटुंबियांची नावे होती, मात्र तिचे नावच नसल्याने तिला मतदान करता आले नाही. सावनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज पुण्यात मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही.

Related Articles

Back to top button