राजकीय
ब्रेकिंग! राज ठाकरेंचा बॅक टू बॅक धमाका

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल ४५ उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत मनसेने १३ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर अन् ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत ठाणे, पालघर, नाशिकमधील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मनसेने भाजपला धक्का देत आपला उमेदवार दिला आहे. परळीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अभिजित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
- मनसेची तिसरी उमेदवार यादी –
- कुर्ला – प्रदीप वाघमारे
- अमरावती – मंगेश पाटील
- नाशिक पश्चिम- दिनकर धर्माजी पाटील
- अहमदपूर चाकूर – नरसिंग भिकाणे
- परळी – अभिजीत देशमुख
- विक्रमगड – सचिन शिंगडा
- भिवंडी ग्रामीण – वनिता शशिकांत कथुरे
- पालघर – नरेश कोरडा
- शहादा – आत्माराम प्रधान
- वडाळा – स्नेहल सुधीर जाधव
- ओवळा माजिवडा – संदीप पाचंगे
- गोंदिया – सुरेश चौधरी
- पुसद – अश्विन जयस्वाल.