देश - विदेश

कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय!

  • देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 2710 सक्रिय कोविड रूग्ण नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच चिंता वाढली आहे.
  • आकडेवारीनुसार केरळमध्ये 1,147 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्र (424), दिल्ली (294) आणि गुजरात (223) यांचा क्रमांक लागतो. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 148 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 116 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
  • गेल्या 24 तासांत सात मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतील मृतांची संख्या 22 झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. बहुतेक कोविड प्रकरणे सौम्य असल्याचे नोंदवले गेले आहे. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Articles

Back to top button