क्राईम
संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबधातून दाखवण्यासाठी शिवाजी चौकात अँब्युलन्स वळवली

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
- तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत कराड याच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. मात्र आतापर्यंत कृष्णा अंधारे अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
- धनंजय देशमुख म्हणाले की, त्या रात्री मला फोन आला होता की, अण्णांना गाडीत घेतले आहे आणि गाडीपुढे गेली आहे. अण्णांना लागले आहे. त्यांना रुग्णालयात घेऊन जायचे आहे, अशी मला माहिती मिळाली होती. परंतु ही माहिती तुमच्याकडे कशी पोहोचली नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. ही माहिती आम्ही ज्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होतो त्यांनी ही गोष्ट कोणालाच दिली नाही. कारण त्यानंतर अधिकारी बदलले गेले म्हणून ही गोष्ठ थांबली.
- जी रुग्णवाहिका होती ती कळंबच्या दिशेने निघाली होती आणि त्याच्या पाठीमागे मस्साजोगमधल्या गाड्या निघाल्या. कारण संतोष देशमुख यांना कळंबच्या दिशेने का घेऊन जात आहे याचा तपास करण्यासाठी मस्साजोगमधल्या गाड्या निघाल्या होत्या. आरोपींकडून कळंबमध्ये एक महिला तयार ठेवण्यात आली होती. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचे दाखवण्याचा कट पोलिसांचा होता. मात्र आमच्या गाड्या पाठीमागे असल्याने पोलिसांचा डाव फसला, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.