ब्रेकिंग! हा फक्त ट्रेलर, आता आम्ही बहिणींसाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे लखपती दीदी योजनेचे उद्घाटन झाले. यावेळी मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारने खूप मेहनत घेतल्याचे नमूद केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
मी सांगतो हा फक्त ट्रेलर आहे. आता आम्ही बहीण आणि मुलींच्या भूमिकेचा अजून विस्तार करणार आहोत, असे मोदी यांनी सांगितले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद बनत आहे. मागील काही वर्षांपासून हे साध्य होत आहे. महिलांना मदत मिळेल याची गॅरंटी घेणारा आधी कुणी नव्हता. पण आता आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही महिलांचे उत्थान करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.
मोदी पुढे म्हणाले, आधुनिक शेती करण्यासाठी आम्ही महिलांना ड्रोन देत आहोत. त्याशिवाय कृषी सखी कार्यक्रम सुरु केला आहे. या सर्व अभियानातून मुली, महिलांना रोजगार मिळेल. त्या कमवत्या झाल्या तर समाजात त्यांच्याप्रती दृष्टीकोन बदलेल. येत्या अर्थसंकल्पात महिलांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकेकाळी महिला, मुलींवर बंधने होती. पण आमचे सरकार त्यांच्या विकासासाठी आणि स्वातंत्र्यासाठी झटत आहे. त्यांच्या हाती बळ देत आहे.