महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांना खुशखबर

केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. रेल्वेने प्रवासी भाड्यात थेट ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. परिणामी रेल्वेच्या प्रवासी तिकिटांचे दर आता कोविड महामारीच्या आधीच्या पातळीपर्यंत खाली गेले आहेत. नवे दर कालपासून लागू झाले आहेत.

याआधी रेल्वे प्रवाशांना पॅसेंजर ट्रेनच्या प्रवासासाठी एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे द्यावे लागत होते. मात्र, आता भारतीय रेल्वेc ‘पॅसेंजर ट्रेन्स’साठी द्वितीय श्रेणीचे सर्वसाधारण तिकीट दर लागू केले आहेत. पॅसेंजर ट्रेन्स आता ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा ‘MEMU/DEMU एक्सप्रेस’ ट्रेन म्हणून ओळखल्या जातात.
काल सकाळपासून रेल्वे अधिकाऱ्यांनी मुख्य बुकिंग आरक्षण पर्यवेक्षकांना या बदलाची माहिती दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट ट्रेन आणि ‘शून्य’ अंकाने सुरू होणाऱ्या गाड्यांवरील सर्वसाधारण वर्गाच्या भाड्यात सुमारे ५० टक्के कपात केली आहे.

Related Articles

Back to top button