महाराष्ट्र

ब्रेकिंग! जरांगेंच्या समर्थकांनी एसटी जाळली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल गंभीर आरोप केले. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचे आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.
या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे.
जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे. अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ तसेच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असे जरांगे यांनी माध्यमांना सांगितले. 

Related Articles

Back to top button